सोलापूर : नीलम नगर भागातील नीलम नगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक, नवदुर्गा देवस्थान चे प्रमुख, जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गोरगरीबांसाठी धावून जाणारे, मितभाषी, काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक कै. विनोद पुरुषोत्तम गायकवाड यांचे अल्प आजाराने आज पहाटे साडेपाच वाजता सोलापुर मार्कंडेय रुग्णालय येथे निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, विवाहित बहिनी, असा मोठ्ठा परिवार आहे. गायकवाड परिवार हा काँग्रेसचा निष्ठावंत आहे, त्यांचे वडील पुरुषोत्तम गायकवाड हे अनेक दशके काँग्रेस पक्षासाठी काम केले त्यांच्यानंतर विनोद गायकवाड हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेऊन काँगेस पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करत 2012 साली नीलम नगर भागातून नगरसेवक झाले होते. या भागात त्यांनी अनेक विकासकामे केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


















