सोलापूर : मागील काही दिवसापासून एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या एकमेव मागणी करिता आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मात्र एस्टी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याच्या तयारीत आहे सरकार बेकायदेशीर कारवाई करून कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपू पाहत आहे ..एसटी कर्मचाऱ्यावर होणारी बेकायदेशीर कारवाई त्वरित थांबवावी एकमेव मागणी करिता गुरुवारी सिटीच्या वतीने आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली…
बेकायदेशीर नियमाचा वापर करून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार करीत आहे असा घणाघाती आरोप आडम मास्तर यांनी यावेळी केला.महाविकास आघाडीचे सरकार आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आंदोलनात उभारणारे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून मागे घेऊन कामगारांचा मोठा विश्वासघात केला आहे असा आरोप देखील यावेळी आडम मास्तर यांनी केला
दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या सिटू च्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली यावेळी सिटूचे पदाधिकारी कार्यकर्ते एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


















