सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे जात पडताळणी समितीच्या तपासणीमध्ये उघड झाले आहे. या प्रकरणात मिलिंद मुळे हे तक्रारदार आहेत. बनावट जात दाखला प्रकरणात सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुळे यांच्यातर्फे सध्या वादग्रस्त आणि चर्चेचा चेहरा असणारे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी वकीलपत्र घेतले आहे. दरम्यान मिलिंद मुळे यांनी माध्यमांशी बोलताना एडवोकेट सदावर्ते यांच्याकडे असलेले वकील पत्र मी आता काढून घेणार आहे, त्यांना तारखांना वेळ मिळत नाही अशातच ते अटक आहेत, त्यामुळे या प्रकरणाला ते न्याय देऊ शकत नाहीत म्हणून आता सदावर्ते यांना बदलून दुसरा वकील देणार असल्याचे मिलिंद मुळे यांनी ‘सिंहासन’शी बोलताना सांगितले….



















