सोलापूर : एसटी महामंडळ विलीनीकरणासाठी मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत. कामगारांच्या मागणीवर अद्यापही निर्णय सरकारला घेता आलेला नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवाशांची तारांबळ होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आंदोलनात उडी घेतली आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनात पोलीस प्रशासनाने आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, यानंतर शनिवारी आडम मास्तर यांनी अक्कलकोट बस स्थानक आगारातील आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली त्यांना पाठिंबा दिला
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना आडम मास्तर म्हणाले, राज्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र कितीही वाईट वेळ आली तरी आत्महत्या करू नका तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. मला अनिल परबांवर विश्वास नाही मात्र अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त आहेत अशा शब्दात त्यांनी परबांवर तोफ डागली, पहा काय म्हणाले मास्तर….


















