सोलापूर : विश्व कृपा विद्या प्रतिष्ठान बाळे या शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शिका कै. मीनाताई दिगंबर ढेपे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पहिल्या उज्वला सुशिलरत्न पुरस्काराची घोषणा मुख्याध्यापक अमोल ढेपे यांनी केली असून यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी डॉ. यशवंत पेठकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, दैनिक पुण्यनगरी चे उपसंपादक भरतकुमार मोरे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामाबद्दल, वाहतूक पोलिस कर्मचारी संजय चौगुले यांना उल्लेखनीय प्रामाणिक कार्याबद्दल तसेच निर्मलाताई ठोकळ प्रशालेतीलशिक्षिका अश्विनी जाधव यांना शैक्षणिक कार्याबद्दल तर ॲनिमल राहात चे डॉ. राकेश कुमार चीतोरा यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
गौरवचिन्ह प्रमाणपत्र ,शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असू 26 जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता डी व्ही ढेपे स्कूल बाळे येथे महापालिकेतील विरोधी पक्ष नेता अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते व दिगंबर दादा ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहर काँग्रेसचे महिलाअध्यक्ष हेमा चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


















