सोलापूर दि. 6 (जिमाका): महाआवास अभियान ग्रामीण-2 अंतर्गत घरकुल पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना कृतीसंगम योजने अंतर्गत योजनेचा लाभ देणेकामी 9 डिसेंबर 2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या स्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये घरकुल पुर्ण उपस्थितीत आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन घेण्यात येणार आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना सौभाग्य येाजना अंतर्गत वीज कनेक्शन देणे, उज्वला गॅस योजने अंतर्गंत गॅस कनेक्शन देणे, मनरेगा विभागामार्फत मनरेगा अनुदानाचा पुर्ण लाभ देणे.
स्वयंसहाय्य्ता समुहाच्या माध्यमातुन उपजिकेचे साधन निर्माण करुन देणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणेसाठी अनुदान पात्र लाभार्थीस देणे, घरकुल बांधकामासाठी बँके मार्फत अर्थसहाय्य पात्र लाभार्थीस देणे.
वरील 1 ते 6 बाबींचा लाभ घेण्यासाठी घरकुल लाभार्थी यांनी दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी पंचायत समितीच्या घरकुल विभागाशी संपर्क साधावा. त्याचबरोबर वरील विषयाचे संबंधित अधिकारी यांनी देखील घरकुल लाभार्थींना मार्गदर्शन करुन नमुद योजनेचा लाभ दयावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.


















