सोलापूर – सोलापूर विकास मंचच्यावतीनं सोलापूर होटगीरोड विमानतळावरुन विमानसेवेच्या आग्रही मागणीसाठी रविवारपासून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे.
सोलापूरचा विकास होण्यासाठी विमानसेवा सुरु होणे गरजेचे आहे. युवक स्थलातरीत होत असून त्यांना विमानसेवेची गरज आहे. उद्योग वाढीसाठी, उद्योजकांना सोलापुरात जलगदगतीने येण्यासाठी विमानसेवा आवश्यक आहे. विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासकिय व लोकप्रतिनिधीना निवेदन देवून पाठपुरावा केला. तरीही विमानसेवा सुरु होत नसल्याने रविवार पासून चक्री उपोषण सुरु करण्यात आले.
सोमवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता या दिवशी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. उपोषणात सहभागी मान्यवरांनी माईकवर येणाऱ्या जाणाऱ्याना आवाहन केले तेव्हा अनेक विद्यार्थी, नागरिक, व्यापारी याठिकाणी येवून स्वाक्षरी करुन या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे चित्र होते. सोमवारी उपोषणस्थळी चंदूभाई देढीया, योगीन गुर्जर, विजय जाधव यांच्यासह काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.



















