सोलापूरचा सूपुत्र तथा महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अयाज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हाती बांधले. तो फोटो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. सोलापूरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा लाडका म्हणून मोहम्मद अयाज यांची ओळख आहे, सोलापूरात बदलत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता गायक अयाज यांनी भविष्यातील महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू आहे.
ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक
ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...