सोलापुर :- निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यासंदर्भात मध्यवर्ती मार्ट संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संपामध्ये सोलापुरातील दोनशे हुन अधिक डॉक्टरांचा संपात सहभाग झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे .
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मिती करावी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय पालिका महाविद्यालयात अपुरे व मोडकळीस आलेल्या वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी आदी विविध मागण्यासाठी राज्यभरात निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.
त्याच अनुषंगाने सोलापुरात देखील निवासी डॉक्टरांचा संप सुरू झालाय. या संपाबाबत राज्यसरकारने निर्णय नाही घेतला तर उद्यापासून अत्यावश्यक सेवा पण बंद करण्याच्या इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी डॉ.विकास कटरे, डॉ दीपक काटे, डॉ ओंकार शेंडे, डॉ सागर राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती.



















