सोलापूर : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या सिद्धेश्वर सहकारी बँकेची निवडणुकीचा निकाल लागला आहे. सर्वसाधारण प्रवर्गाच्या दहा जागेसाठी झालेले या निवडणुकीत शिवदारे गटाने एकहाती वर्चस्व राखले आहे. दहाच्या दहा जागा सुमारे अडीच हजारच्या फरकाने विजय झाल्या आहेत.
15 संचालक मंडळ असलेल्या या बँकेच्या महिला 2, अनुसूचित जाती जमाती 1, ओबीसी 1 व भटक्या विमुक्त जाती जमाती 1 या पाच जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित दहा सर्वसाधारण जागेसाठी ही निवडणूक लागली होती. या दहा जागेसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे पॅनलने कपबशी हे चिन्ह घेतले, तर विरोधातील नागनाथ जावळे यांना विमान तर बसवराज माशाळे यांना कपाट हे चिन्ह मिळाले. या निवडणुकीसाठी चार डिसेंबर रोजी मतदान होणार होते मात्र काही कारणास्तव ही निवडणूक पुढे गेली. 25 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले. 3589 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 3423 मते वैध ठरली तर 166 मते बाद झाली. सोमवारी जुना एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात या निवडणुकीसाठी मतमोजणी झाली.
शिवदारे पॅनल मधील विजयी झालेले दहा उमेदवार पुढील प्रमाणे…
बाळासाहेब आडके-2964, शिवानंद कोनापुरे-3102, नरेंद्र गंभीरे-3056, प्रकाश वाले-2987, मल्लिनाथ पाटील-3018, पशुपती माशाळ-2968, सिद्धेश्वर मुनाळे-2995, प्रकाश हत्ती-2902, इरप्पा सालक्की-2961, महेश सिंदगी-3023
तर विरोधातील नागनाथ जावळे-390 व बसवराज माशाळे-592 मते मिळाली.
सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी काम पाहिले.
यापूर्वी बिनविरोध झालेले पाच संचालक पुढील प्रमाणे



















