सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील तेरा दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या समोर चक्री उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौर्यावर होते.
त्यांनी नियोजन भवनात सोलापूर विकास मंच जिल्हा प्रशासन महामार्ग पालिका प्रशासन एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्त बैठक लावली. या बैठकीनंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. सोलापूर विमानतळ संदर्भात न्यायालयाच्या भानगडीत मी पडणार नाही. विमानसेवा कशी सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
एका बाजूला साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा आहे मग दुसऱ्या बाजूनेच विमान उतरेल आणि त्याच बाजूने विमान उडेल असा मार्ग आम्ही काढला आहे. त्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर महाराज, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मदत घेणार आहोत, लोकसभेचे अधिवेशन सुरू होईल त्या अधिवेशनात चर्चा केली जाऊन मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा….


















