सोलापुरातील भारती विदयापीठ येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांचे वतीने जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याबाबत व जात वैधता प्रमाणपत्राबाबत येणा-या अडचणी याबाबत शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारती विदयापीठ महाविदयालयाचे प्राचार्य एम.बी महामुनी, जातपडताळणी समितीच्या उपायुक्त छाया गाडेकर, प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, जात पडताळणी व्यवस्थापक श्रीकृष्ण मोटे, संशोधन सहाय्यक संतोश सुनगार, समतादुत गायकवाड, समान संधी केंद्र प्रमुख दहिफळे, रासकर, कोळी, बोरसे सर्व प्राध्यापक वर्ग महाविदयालयातील वर्ग 11 वी 12 विज्ञान शाखेतील विदयार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जात वैधता प्रमाणपत्राबाबत पडताळणी बाबतचे मार्गदर्शन छाया गाडेकर यांनी केले. जात पडताळणी सदंर्भात येणा-या अडचणी विदयार्थीं यांना प्रस्तावासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडावे, वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. उपस्थित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात विचारलेल्या वेगवेगळया प्रंश्नांचे निरसण योग्य प्रकारे करण्यात आले .
महाविदयालचे प्राचार्य महामुनी यांनी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत व अचूक दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मान्यवरांचे आभार व्यकत केले. सुत्रसंचालन आर एच देवकर यांनी केले.




















