सोलापूर : तुमच्या पुण्याच्या प्लॅटमध्ये मी भाड्याने राहण्यास तयार आहे असे सांगून आमचे साहेब जसे सांगतील तशा इन्स्ट्रक्शन फ़ॉलो करा म्हणून फोन पे द्वारे एक लाख 15 हजार रुपये काढून ऑनलाइन फसवणूक केल्याचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विशाल सिध्दय्या हिरेमठ वय – ३२ वर्ष व्यवसाय-खा. नोकरी. रा. घर नं.७९ कित्तुर वनम्मा नगर सफुल विजापुर रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अमितकुमार (पुर्ण नाव माहित नाही) मो.क्र.८८११०४५०२७ व २) अज्ञात इसम नाव पत्ता माहित नाही मो.क्र.८३१८५१५८०५ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीस आरोपीत क्र.१ याने फोन करुन मी तुमचा पुणे वाघोली येथील फ्लॅटमध्ये भाडयाने राहण्यास तयार आहे परंतु माझे साहेब बोलणार आहेत. आमचे साहेब जसे सांगतील तसे इन्ट्रक्शन फॉलो करा असे सांगुन दहा पंधरा मिनिटाने फिर्यादीच्या फोन पे वर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ८३१८५१५८०५ या नंबरवरून फोन करुन, क्युआर कोड फिर्यादीच्या भावाच्या व्हॉट्सअपला पाठवुन फिर्यादीच्या फोन पे वरुन क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगुन, आमच्या (आरोपीत) मिलिटरीमध्ये असे सिस्टीम आहे.
तुम्ही जितके पैसे पाठविता तितके पैसे तुमच्या अंकाऊंटला क्रेडिट होईल असे बतावणी करून आरोपीत क्र.१ जसे सांगेल तसे प्रोसेस करून, फिर्यादीच्या अंकाउंटमधुन ९०,०००/- रुपये फिर्यादीचा भाऊ सागर यांच्या अंकाउंटमधुन २५,०००/-रु. असे एकूण १,१५,०००/-रु फोन पे करण्यास सांगुन, फिर्यादीची व भावाची फसवणुक केली आहे.पोलीस निरीक्षक जगताप हे तपास करत आहेत.
















