सोलापूर : सोलापुरातील होजिअरी कपड्यांचे व्यापारी कमलेश ट्रेडर्स यांच्यावतीने अंडर गारमेंट कंपनी असलेल्या कॉम्फोर्ट लेडी व Galaxy या कंपनीच्या रिटेलर्सचा स्नेहमेळावा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्यूटिव्ह या ठिकाणी संपन्न झाला.
या मेळाव्याला कमलेश ट्रेडर्सचे संस्थापक त्रिभुवन कटारा, संचालक निलेश कटारा, गॅलेक्सी कंपनीचे सीईओ वेदांत सराफ, कंपनीचे रिजनल मॅनेजर अमित पांडे, भूषण चौधरी, राजन हबीब यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहर जिल्ह्यासह उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यातून होजिअरी कपड्यांचे व्यापारी या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सोलापूर विभागातील सुमारे दीडशेहून अधिक व्यापाऱ्यांनी उपस्थिती दर्शवत गॅलेक्सी अंडरगारमेंटच्या सॅम्पलची पाहणी केली आणि मोठ्या प्रमाणात कंपनीच्या प्रोडक्टची बुकिंग केली.
कमलेश ट्रेडर्सचे त्रिभुवन कटारा यांनी या स्नेहमेळाव्या मागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, मी हा व्यवसाय मागील 33 वर्षांपासून करतोय, ग्राहक हाच केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. गॅलेक्सी ही कंपनी कमी किमतीमध्ये बेस्ट क्वालिटी देण्यास प्राधान्य देते, म्हणूनच मी या कंपनीला जोडले गेलो आहे. त्यामुळे तुम्हीही सोबत राहा असे आवाहन केले.
संचालक निलेश कटारा यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करत गॅलेक्सी कंपनीला सर्वांनी जोडले जावे त्यातून आपला व्यवसाय आणि उत्पन्न वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
गॅलेक्सी कंपनीचे सीईओ वेदांत सराफ म्हणाले, कंपनीने सर्व वयोगटांचा विचार प्रॉडक्ट तयार केले आहेत. आपला हा सहभाग निश्चितच कंपनीची शान वाढवेल असे सांगत आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनची घोषणा केली.



















