सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात झालेल्या डॉग शोप्रमाणेच कॅट शोनेदेखील सोलापूरकरांची मने जिंकली. देशी-विदेशी ५० मांजरांच्या विविध जातो पाहून सोलापूरकर अवाक झाले.
होम मैदान येथे भरविण्यात आलेल्या श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी शनिवारी फेंट शो’चे आयोजन करण्यात आले होते. या फॅन्सी फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी सोलापुरातील मांजरपालक आपल्या लाडक्या मांजरांसह सहभागी झाले होते.
सोहेल शेख (प्रथम), इम्रान शेख (व्दितीय), मोहीन शेख (तृतीय) व (चतुर्थ). नाझिया अत्तरवाले यांच्या मांजराने (पाचवा) क्रमांक मिळविला. तर लहान गटात झयाना खान (प्रथम) व (द्वितीय) तर श्रीपाद सोमाणी यांच्या मांजराने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील सर्व मांजरे ही परेसियन या एकाच जातीतील होती.
दरम्यान, यातील विजेत्या मांजरांचा त्यांच्या मालकासह समानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते तसेच कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे, आत्मा प्रकल्पाचे माजी उपसंचालक विजयकुमार वरवडे, सांगलीच्या स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे, संचालिका रेखा शेटे, सचिन एडके आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या शोचे परीक्षक म्हणून सोलापूरच्या सना खान यांनी काम पाहिले. यासाठी केनाल असोसिएशन ऑफ सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष महेश दळवी, आयंत दळवी व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.
कैट शोमध्ये मोठ्या गटात मांजर पालक झायना खान (प्रथम), ओंकार राठोड (द्वितीय), मुझमील कागदी (तृतीय), अनिल माशाळकर (चतुर्थ) तर लहान गटात शफी शेख (प्रथम), शिवानी पवार (व्दितीय), मुस्कान शेख (तृतीय), जावेद बेग (चतुर्थ) आणि साहिल शेख यांच्या मांजराने (पाचवा) क्रमांक मिळविला.























