सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा युवक प्रदेश सचिव विनोद भोसले यांनी शनिवारी आपल्या ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्री यांना ट्विटवर विनंती केली आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या जयंती उत्सवाच्या यादी मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा समावेश करावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागास त्यांनी द्यावे जेणेकरून 2023 पासून ही जयंती शासन स्तरावर साजरी होईल.


















