अवघ्या 16 व्या वर्षी सोलापूरचे नाव जगभरात लौकिक करणारी किर्तीने काल अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट ऑफ इंडिया 38 किलोमीटर सलग स्वीमिंग 7 तासात करत,वर्ल्ड रेकॉर्ड केला व सोलापूर नव्हे तर महाराष्ट्रातून किर्तीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना,आज आमदार सुभाष बापू देशमुख यांनी कीर्तीच्या सत्कारासाठी निवासस्थानी भेट देऊन कीर्ती व तिच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या व यथोचित सत्कार केला*
आमदार सुभाष बापू देशमुख यांनी,कीर्तीचे व तिचे वडील नंदकुमार भराडीया यांच्या जिद्दीचे कौतक करत,किर्तीला शुभेच्छा देताना म्हणाले की,आज तुझ्यामुळे सोलापूरचे नाव लौकिक जगभरात झाले असून,सोलापूरची कन्या म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान असल्याचे म्हणाले*
याप्रसंगी जलतरणपटू कीर्ती भराडीयाचे वडील नंदकुमार भराडीया,त्यांचे काका व कुटुंबियासमवेत नगरसेवक जगदीश पाटील, भाजयुमोचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, बिपीन पाटील,सुरज पाटील,सूर्यकांत जिंदम,संदीप महाले,श्रीकांत चाटला,सतीश पारेली, शिलवन्त छपेकर,कृष्णा झंंवर,दमानी,तापडिया, विजय कोळी उपस्थित होते*



















