Solapur : 2 ते 4 जुलै दरम्यान औरंगाबाद येथे झालेल्या 15 व्या सीनियर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सोलापूर संघाने दहा वर्षानंतर अंतिम सामन्यात अहमदनगर संघाचा 5 -1 होमरनने विजेतेपद पटकावले.
सुरुवातीस सोलापूर संघाने यवतमाळ संघास 11-0 होमरनणे, बीड संघासोबत 10-0 होमरनणे, उपउपांत्य सामन्यात जळगाव संघ विरुद्ध 8-4 होमरनने, उपांत्य सामन्यात मुंबई उपनगर संघाविरुद्ध 11-2 होमरनणे, अंतिम अंतिम सामन्यात अहमदनगर विरुद्ध जिंकून विजेतेपद पटकावले
या संपूर्ण स्पर्धेमध्ये कर्णधार अजय चव्हाण याच्या नेतृत्वात सिताराम भांड व अक्षय हावळे यांनी उत्कृष्ट पीचिंग केली .अमर कारंडे ,स्वप्निल भोसले, पवन जगझाप व सर्व खेळाडूंनी संघास विजेतेपद पटकावण्यात मोलाची कामगिरी केली .
या सर्व खेळाडूंना प्रा. संतोष खेंडे, मारुती घोडके व गंगाराम घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंचे सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीए विनोद भोसले, सॉफ्टफुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजीनाथ हत्तुरे, सकल मराठा समन्वयक माऊली पवार, बेसबॉलचे उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी, संचालक प्रशांत राणे यांनी अभिनंदन केले.


















