सोलापूर : सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटणार असे चिन्ह दिसत आहेत. गुरुवारी अधिवेशनात राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील विस्कळीत पाणीपुरवठा संदर्भात आणि कर्नाटक सरकारच्या विना परवाना पाणी वापरामुळे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा धोक्यात येत आहे या विविध मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
तसेच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनीही सोलापुर शहराच्या पाणी पुरवठा नियोजन, तसेच दुहेरी पाईपलाइनचे काम लवकर सुरु करून सोलापुरला नियमित पाणीपुरवठा करावी अशी मागणी केली. कुणी काय मुद्दा मांडला पहा हा व्हिडीओ..


















