सोलापूर : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे यंदाची सिद्धेश्वर यात्रा ही मोठ्या निर्बंधाखाली पार पडत आहे. यात्रेतील तिसऱ्या दिवशीचा प्रमुख विधी म्हणजे रात्रीच्या सुमारास होणारा होमहवन सोहळा. यादिवशी नंदीध्वजाला नागफणी बांधून त्याची मिरवणूक काढली जाते,
सातही नंदीध्वज होम मैदानावर आल्यानंतर होम विधी सोहळा होतो. यंदा मात्र महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी कोरोना निर्बंधांमुळे होम मैदान येथे होम प्रदिपन कार्यक्रमासाठी नंदीध्वज विरहीत मिरवणूक योगदंडासह श्री सिध्देश्वर मंदिर पासून फडकुले सभागृहाच्या बाजूच्या रस्त्याने नॉर्थकोटकडे असलेल्या मार्गाकडून होम मैदानावर प्रवेश करतील. तेथून होम मैदानावर होम कुंडाजवळ निश्चित केलेल्या योगदंडधारक व मानकरी यांचेसह औपचारिकता म्हणून सदर विधीस उपस्थित राहणेस परवानगी देणेत येत आहे. असे आदेश दिले होते. परंतू,
पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात ताफा दाखल झाला. स्वतः पोलीस आयुक्त हरीश बैजल हे आले शेवटी महानगरपालिकेचा जेसीबी बोलावून प्रवेशद्वार उघडण्यात आले रस्ता स्वच्छ करण्यात आला आणि त्यानंतर त्याच मार्गाने होम मैदानावर पालखी मिरवणूक गेली आणि हा होम विधी सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.


















