Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात हत्तरसंघ कुडल होणार पर्यटन केंद्र ; सुभाष देशमुखांचा पाठपुरावा ; असा आहे विकास आराखडा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ कुडल या तीर्थक्षेत्राचा विकास निरा नरसिंगपूरच्या धर्तीवर होणार आहे. याचा प्राथमिक आराखडा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला आहे. हत्तरसंग कुडलचा विकास होण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर त्याला यश आले आहे.

हत्तरसंग कुडलच्या विकासासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माळी, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी देवस्थानचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 हत्तरसंग कुडलच्या नव्या आराखड्यामध्ये भीमा सीना संगम येथे स्कायवॉक बांधणे, टाकळी येथील मुख्य रस्त्यापासून ते कुडल संगमपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे, दळणवळणाच्या सोयी निर्माण करणे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तनिवास बांधणे, सभामंडप, व्यापारी गाळे बांधणे, नदी परिसरात बोटिंग सुरू करणे, भीमा नदीच्या बाजूस घाट बांधणे, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी लेसर शो सुरु करणे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क बांधणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बांधणे, मंदिरा समोर कायमस्वरूपी हेलीपॅड तयार करणे, दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी सुसज्ज असे वाहनतळ उभा करणे, टाकळी हायवेजवळ मोठा माहिती फलक उभारणे, टाकळी हायवेपासून ते मंदिरापर्यंत पथदिवे बसवणे यासह विविध बाबींचा समावेश होणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी तीर्थक्षेत्राचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी चित्रफीत काढावी,  छोट्या बाबी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घ्याव्यात या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शैक्षणिक सहली काढाव्यात यासह विविध सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम घ्यावयाच्या कामाला प्राधान्य द्यावे, प्रस्तावित कामांचे वर्गीकरण करावे, अंतर्गत येणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करावे, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या धरतीवर प्रचार आणि प्रसार करावा, बांधकाम विभागाने लवकरात लवकर पूर्व गणक पत्रक ( इस्टिमेट) सादर करावे यासह विविध सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉक्टर व्यंकटेश मेतन यांनी हत्तरसंग कुडलची वेबसाईट काढावी या ठिकाणी गाईडची नियुक्ती करावी, मंदिरावर एक लघुपट करावा,  परिसरात पुरातत्त्व संग्रहालय बांधावे यासह विविध सूचना केल्या. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हत्तरसंग कुडलला अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार: आ. देशमुख

प्रशासनाने लवकरात लवकर सर्व बाबींची पूर्तता करून त्याचा अहवाल सादर करावा. यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आपण मिळवू, हत्तरसंग कुडलला राज्यातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवू असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

‘समाज कल्याण’ला तंबी तर ‘कृषी’च्या कामावर 50-50 समाधान ; झेडपीत सेसच्या खर्चाचे चाललंय काय

Next Post

दुःखद ! माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव माशाळे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव माशाळे यांचे निधन

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972829
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group