सोलापूर : गॅस दरवाढीचा विरोधात सोलापुरात काँग्रेस भावना समोर बुधवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकार हाय हाय…,भाग गई रे भाग गई, स्मृती इराणी भाग गई.., मोदी सरकार की तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत स्मृती इराणी यांच्या नावाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोंब ठोकली.
यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्या स्मृती इराणी यांचा मुखवटा घालून हातामध्ये प्रतीकात्मक गॅस सिलेंडर घेऊन वेड्यासारखे नसल्याचे दिसून आले.
दरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, घरगुती गॅस पन्नास रुपये महागला आहे तसेच कमर्शियल गॅसमध्ये तर 350 रुपये वाढ झाली आहे. ही महागाई भारत देशात सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही ज्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार होते तेव्हा गॅस सिलेंडर साडेतीनशे रुपये झाल्यानंतर आताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या वेड्या सारख्या नाचल्या होत्या आता तर घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपये पेक्षा महाग झाला आहे त्यामुळे काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांचा मुखवटा घालून त्यांचा निषेध नोंदवला.



















