सोलापुर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशीलकुमार म्हेत्रे यांचा शनिवारी वाढदिवस होता. मोची समाजाचे व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बसवराज म्हेत्रे यांचे सुशीलकुमार हा सुपुत्र. सुशीलकुमारला हा वाढदिवस आयुष्यात कायमचा आठवणीत राहणारा ठरला. त्याला कारणही तसेच होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे या दिवशी सोलापुरात होते. साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हेत्रे कुटुंबीय ‘जनवात्सल्य’वर पोहोचले. सुशीलचा वाढदिवस असल्याचे समजताच साहेबांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, बसवराज म्हेत्रे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हनमंतु सायबोलू, प्रवीण जाधव, राज सलगर, आनंद भंडारे, सिद्राम आनंद, शंकर मागेरी राजेंद्र कोरे नागनाथ म्हेत्रे तायप्पा साखरे सतीश म्हेत्रे, सुशील बंदपट्टे, भिमण्णा अंलझेडे, जयवंत होसमनी आदि उपस्थित होते.




















