सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य संभाजी भिडे यानी महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत.
सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. कुणी काय घालावं हे आम्हाला शिकवू नका देशप्रेम आमच्या हृदयात आहे, तुमचं पक्षप्रेम आहे आमचं खरं देशप्रेम असल्याचं सांगत महिलांनी कसं वागावं कसं राहावं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही या शब्दात भिडे यांच्यावर शिंदेंनी तोफ डागली. पहा त्या काय म्हणाल्या…


















