सोलापूर : सुपीक शेत जमिनीतून माती आणि मुरूम चोरून नेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळ गावातील शेतकरी पती-पत्नीने सोलापुरात बुधवारी जोगवा मांगो आंदोलन करत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
शेतकरी अशोक ओहोळ व प्रभावती ओहोळ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
१)गट नं. २३० मध्ये ४ हेक्टर जमीनीपैकी ६ एकर जमीनीमधील सुपीक माती व विहीरीचा उपसा चोरुन नेहलेला आहे. २) ४ एकर ज्वारीचे उभे पीक चोरून नेहलेले आहे. ३) बोअरमध्ये दगडे टाकून बुजविलेले आहे. ४) पत्राशेड फाडून दरवाजा तोडून कामाची साहित्य व प्रापचिक साहित्य चोरुन नेहलेले आहे. वरील या सर्व पिकाचे व साहित्य शेड, प्रापचिक साहित्य व सुपिक माती व मुरुम यांची नुकसान भरपाई अर्जदार यांना ४ ते ५ लाख रुपये देण्यात यावी.
दरम्यान संबंधितावर कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावाने पुनम गेटसमोर प्रतिकात्मक पर्डी तयार करुन जोगवा भिक मागो आंदोलन उपोषण न्यायांच्या हक्कासाठी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
माध्यमांशी बोलताना ओहोळ म्हणाले, जिल्हाधिकारी साहेबांनी तोंडी आश्वासन दिले होते मात्र त्याचे कोणतेही कार्यवाही झाली नाही म्हणून मला नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला.


















