केंद्र शासनाने वाढवलेली महागाई व महाराष्ट्रातील राज्य सरकारने सादर केलेले बजेट हे केवळ आश्वासने व जनतेला गाजर दाखविणारे अर्थसंकल्प असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोलापुरात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली जनतेला गाजर वाटप करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, जिल्हासंघटक अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, भीमाशंकर म्हेत्रे, शहर संघटक अतुल भवर, संतोष केंगणाळकर, रवी कांबळे, युवतीसेना शहर प्रमुख रेखा आडकी, उपशहर प्रमुख रेवन पुराणिक, सुरेश जगताप, रतन खैरमोडे, धनराज जानकर, लहू गायकवाड, संजय गवळी, चंद्रकांत मानवी, अजय खांडेकर, अण्णा गवळी, दीपक गवळी, सोमनाथ पात्रे, बनसिद्ध काटकर, संभाजी कोडगे, विठ्ठल कुराडकर, सुरेश शिंदे, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, रमेश चीलवेरी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
बरडे म्हणाले, राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जनतेला एकप्रकारे दाखविलेले गाजर आहे, महागाईने जनता त्रस्त असताना या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

















