सोलापूर : सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी कायम आग्रही असणारे व आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे डॉ आडकी यांनी आपल्या हॉस्पिटल समोर एका वृद्धाला काठीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर वृद्ध जखमी असून या प्रकरणात डॉ अडकी यांच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान डॉ आडकी यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संबंधित व्यक्तीने मागील अनेक दिवसांपासून आमच्या स्टाफला दारू पिऊन त्रास दिला असल्याने त्याला अद्दल घडवल्याचे सांगितले.
विजय राणोसिंग चौधरी वय 58 राहणार बेडरपूल असे मारहाण झालेल्या वृद्धांचे नाव आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हा आडके हॉस्पीटलचे बाजूस असलेले व सिव्हील हॉस्पीटलचे भिंती लगत असलेले सार्वजनिक शौचालय येथे लघवी करून फिर्यादी घरी जात होता. फिर्यादीचे अंगावर हॉस्पीटलचे वरच्या मजल्यावर अंगावर कोणीतरी खरकटे पाणी टाकले म्हणून विचारणा करीत असताना डॉ आडकी यांनी फिर्यादीस काही एक न विचारता तेथील वॉचमनच्या हातातील फायबर काठी घेवून फिर्यादीस शिवीगाळी करत फिर्यादीच्या डोक्यास, पायास हातावर जबर मारहाण केली आहे. यातूनच फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंज्यास व उजव्या पायाच्या नडगीला गंभीर जखमी होवून त्यातून रक्त येत आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नदाफ करीत आहेत.
दरम्यान या प्रकरणात फिर्यादी काय म्हणतात आणि डॉ अडकी काय म्हणतात पहा हे व्हिडीओ


















