सोलापूर : शहरातील लष्कर परिसरात असलेल्या फलटण मशीद जवळ राहणाऱ्या एका 21 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून ते सर्व पसार झाले आहेत. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक सिव्हीलमध्ये जमा झाले आहेत.
हा मृत्यू संशयास्पद असून पती, सासू, नणंद यांच्यामुळेच तिचा झाल्याचा आरोप होत असून, त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा मुलीच्या आईवडिलांनी दिला आहे.
मुलीचे नाव मिजबा कुरेशी असून तिच्या पतीचे नाव शाहिद कुरेशी असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मुलीचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मुलगी विजापूर येथील असून मुलगा लष्कर भागातील रहिवासी आहे. मुलीच्या नातेवाईकांनी आरोप लावला आहे की,
लग्नाच्या वेळेला पाच लाख रुपये दिलेले असताना पुन्हा दहा लाख रुपयांची मागणी सासरकडच्या लोकांकडून सतत होत होती मुलगा देखील सतत मारहाण करत असल्याचे सांगितले. मुलीच्या आईने दिलेली माहिती अशी आहे की,…


















