सोलापूर : इंधन दरवाढ, गॅस दरवाढ याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर युवकच्या वतीने प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर व शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या महागाई, इंधन दरवाढ व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिलांना लाकडाची मोळी वाटप करण्यात येणार होती यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मज्जाव केला एक महिला लाकडं घेण्यात आली मात्र ती पोलिसांना पाहून घाबरली पण लाकडं घेताना केवळ फोटो काढला आणि न घेताच ती निघून गेली. आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्याना आपल्या ताब्यात घेतले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

















