सोलापुरातील सैफुल भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते सिद्धेश कलमेश कोलकर यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात स्व. किरण पवार यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
स्वर्गीय पवार यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सोलापूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला वाढवण्यासाठी सैफुल युवक काँग्रेसची शाखा उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शाखा उद्घाटन केले होते. कोलकर यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या समाजकार्याकडे प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले.
सिद्धेश कोलकर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाने हद्दवाढ भागामध्ये काँग्रेस पक्ष वाढवणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल जाधव उपस्थित होते.

















