सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी एडवोकेट सदावर्ते यांचा प्रतिकात्मक पुतळा तसेच भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली अखेर त्या चार कार्यकर्त्यांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई राकेश सुरेश आंपेपागुल, नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत तानाजी बाबर, वय ३६ वर्षे, रा. १२ ड, शिवगंगा नगर, गोविंदश्री मंगल कार्यालय, सोलापूर, बसवराज रेवणसिध्द कोळी, वय ३३ वर्षे, रा. ५७, एन जी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर, मिथुन संतोष लोखंडे, वय २२ वर्षे, जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर, सुहास विजय कदम, वय ३० वर्षे, रा. • सोन्या मारुती मंदिरजवळ, सलगरवस्ती डोणगावरोड, सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सिल्वर ओक येथे एस.टी. कर्मचारी यांनी केलेल्या आंदोलनाचे निषेधार्थ एका बांबुला कडबा बांधुन त्यावरील टोकाला भाजपा पक्षाचे कमळाचे चिन्ह लावलेला प्रतिकात्मक पुतळयास आग लावुन पळत येवून पोलीसांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन ज्वालाग्राही पदार्थाचे बाबतीत हयगयीचे वर्तन करीत असताना मिळुन आले आहेत.





















