सोलापूर : दुकानात वारंवार येऊन कामगारांना तुमची मालकीण छान दिसते मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून मुद्दाम गुलाबाचा बुके दिला, एवढ्यावर न थांबता घरी जाताना गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी एका युवकावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ही सोलापूर शहरातील एका राजकीय नेेत्याची मुलगी असल्याची माहिती आहे. सैपन जमखंडी असे आरोपीचे नाव आहे. मागील तीन महिन्यापासून आरोपी कडून हा प्रकार सुरू होता. फिर्यादीचे शहरात मिठाईचे दुकान आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
गेल्या तीन महीन्यापासून ते दि. 08 मार्च 2022 रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास सैपन जमखंडी नावाच्या इसमाने माझ्या मिठाई दुकानात दिवसातुन तीन चार वेळा ग्राहक म्हणुन येऊन आमच्या दुकानातील मँनेजर व कामगार यांना तुमची मालकीण खुप छान दिसते मला तिच्याशी लग्न करायचे आहे.
असे म्हणुन निघुन गेला व मला ओळख नसताना त्याने मला लाल रंगाची गुलाबाचा बुके आणुन दिला व भी घरातुन दुकानाकडे व दुकानातुन घराकडे माझ्या गााडीवरुन जात असताना माझ्या गाडीचा पाठलाग त्याने त्याची चॉकलेटी कलरची होंडा अॅक्टीया गाडी नंबर MH13DL6158 वरुन पाठलाग करुन मला त्रास दिला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक काळे या तपास करीत आहेत.

















