सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मानवतेसाठी योग’ या विषयावरील योग शिबीराचे, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी सात ते आठ या वेळेत आयोजन करण्यात आले. जागतिक योगदिनाचे हे आठवे वर्ष साजरे करण्यात येत आहे. योगाचा प्रसार व्हावा म्हणून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युारो, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन झाले.
यावेळी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महाराज, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त डॉ दिपाली धाटे, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, माजी कुलगुरु डॉ इरेश स्वामी, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर हरीभाई प्रशालेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाची सुरुवात शंखध्वनीने झाली, यावेळी शिथीलकरण व्यायाम, विविध योगासने, बैठे आसने, ध्यानधारणा करण्यात आल्या. जैन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेने सर्वांचे लक्ष तर वेधून घेतलेच मात्र उपस्थितांना अवाक केले.
खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांनी निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अन्यनसाधारण आहे. योग म्हणजे थेट परमात्माशी जोडले जाणे असे सांगत भारत देश आरोग्यमय होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योगदिनाचं महत्व पटवून दिले आहे….
महापालिका आयुक्त शिवशंकर म्हणाले, विविध आजारांवर योग हे उपयुक्त ठरले आहे. योग म्हणजे केवळ आसन नाही तर चिंतनमय जीवन जगणे हे आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात दररोज योग केले पाहिजे असे सांगतानाच महापालिका शाळांमध्ये योग क्लास सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला…
योगाच्या उपक्रमामध्ये जिल्हााधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यायदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, राज्य राखीव पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी. बटालियन 9 व 38, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, भारत स्कााऊट गाईड, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्थाा, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्या्ण योग, रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग, योग परिषद आणि योग साधना सेवासदन या शहरातील सर्व संस्थांचे सदस्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.



















