सोलापूर – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी वेगवेगळी नियमावली जाहीर केली आहे.त्या अनुषंगाने सर्व पेट्रोल पंप धारकांसाठी गेल्या आठवड्यात नवीन आदेश देण्यात आला होता. त्या आदेशानुसार वाहनधारकांना दोन लसीचे प्रमाणात दाखविल्याशिवाय पेट्रोल न देण्याचे आदेश दिले होते;पण सात रस्ता येथील कारागीर पेट्रोल पंप चालकाने जिल्हाधिकारी यांचा आदेश भंग केला. त्यामुळे सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी १० हजार रुपयांची दंड आकारणी केली. तसेच पेट्रोल पंपावर विनामास्क आलेल्या वाहनधारकांना देखील दंड करून ४ हजार रुपयांची दंड वसुली केली.
ही कारवाई API क्षिरसागर,ASI फडके,पो.हे शब्बीर तांबोळी,पो.ना मुटकुळे व डीबी पथक यांनी ही कारवाई केली आहे.

















