महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे त्या पार्श्वभूमीवर विदर्भात अनेक जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री जनतेशी संवाद साधताना आठ दिवसाची मुदत दिली आहे शासनाने घालून दिलेले नियम पाळा अन्यथा लॉक डाऊन करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात काही निर्बंध घातले आहेत आता यापुढे सर्व मंगल कार्यालय कोचिंग क्लासेस, रुग्णालय यांची तपासणी केली जाणार आहे सर्व मोर्चे राजकीय कार्यक्रम यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे मोठ्या मंदिरांना ही काही नियम घालून देण्यात आले आहेत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर मास्क न घालून फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे रविवारी सात रस्ता परिसरात लक्ष्मीकांत म्हेत्रे या व्यक्तीला विना मास्क प्रकरणी कारवाई करत तब्बल दोन हजार रुपये दंड पोलिसांनी केला आहे. सध्या ही दंडाची पावती सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे.





















