सोलापूर : उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख तसेच महेश कोठे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे सुरेश कोकटनूर यांनी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सोमवारी हा प्रवेश कार्यक्रम झाला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, हरिभाऊ चौगुले, प्रियदर्शन साठे, सागर शितोळे, महिला शहराध्यक्ष जयश्री पवार, सुनंदा साळुंखे, अनिता गवळी, माधुरी कांबळे, सुजित खुर्द, बापू भोसले, सागर सोलापूरे, समर्थ मोटे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















