क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर कार्यालयाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सात रस्ता सोलापूर पर्यंत अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागनाथ चौगुले व इतर उपस्थित मान्यवर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात केली. या रॅलीमध्ये शासकीय वसतिगृह सोलापूर, समाज कार्य महाविदयालय व विजाभज आश्रमशाळेतील विदयार्थी व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सकाळी १०.३० वाजता सांस्कृतिक सभागृह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सात रस्ता सोलापूर येथे प्रा. डॉ. रविंद्र चिंचोळकर, विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठ सोलापूर यांचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्यावर आधारीत प्रबोधनपर व्याख्यान दिले. तसेच मनिषा चव्हाण यांनी मी सवित्रीबाई बोलतेय या एकपात्री एकांकीका सादर केली.
सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी, सामजकार्य महाविदयालयाचे प्राचार्य व विभागप्रमुख, आश्रमशाळेतील कर्मचारी, सर्व तालुका समन्वयक, जिल्हा प्रकल्प अधिकारी बार्टी, व समतादूत उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय बनसोडे, सहशिक्षक यांनी केले असून आभार प्रदर्शन राजश्री कांबळे समतादूत यांनी केले.



















