जिल्हा परिषद, सोलापूर मराठा सेवासंघ शाखेतर्फ चालु वर्षा राजमाता जिजाऊ जयंती , छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात जिल्हा परिषदे मध्ये साजरी करण्यात आली होती त्याप्रमाणेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेणेत आला. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी ( 132 व्या जयंती निमित्त ) भिमगीताचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. जयंती निमित्त घेणात येणाऱ्या नियोजन करणेसाठी आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यांत आला असल्याची माहिती मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी सांगीतले.
सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्यगीताचे गायन करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत येईल. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर यांचेतर्फ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये स्वानंद ,टीचर्स् म्यूझिकल ग्रुप प्रस्तुत भीमगीतांचा कार्यक्रम – ह्यावेळस रुपेश क्षीरसागर, किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, आण्णा सुरवसे, आशा प्रक्षाळे व एकनाथ कुंभार आदी जिल्हा परिषद शिक्षकांचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
सदर प्रसंगी सचिन चव्हाण,राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, सुहास चेळेकर, सुर्यकांत मोहिते,विष्ठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील ,अजित देशमुख, महेश पाटील, नितीन जाधव, विशाल घोगरे, अनिल पाटील, भूषण काळे, संतोष शेळके,चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले,सुधाकर माने – देशमुख,राजु देशमुख, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, गोपाळ शिंदे, हरिभाऊ देशमुख, राहुल शिंदे, जीवन भोसले, नितीन पाटील, आनंद साठे, विष्णू पाटील, रोहीत घुले, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, सोनाली कदम, सुचिता जाधव, ज्योत्सा साठे, उषा भोसले , अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, अंजली पाटील, सविता मिसाळ, सोनल केत उपस्थित होते.