सोलापूर : मराठा युवा सेनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून हिंदू धर्म व मराठा समाज वारकरी संप्रदाय यांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीला जाऊन आमच्या देवी देवतांच्या बाबतीत व्हिडिओ आम्ही सोशल मीडियामध्ये पाहत आहोत मुंबई येथे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन येथे आम्ही त्याबाबत तक्रार ही दाखल केलेली आहे.
आमच्या देवी देवतांच्या बद्दल धर्माबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल अशा प्रकारे कोणी घाला घालत असेल त्याबद्दल आम्ही लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचं काम करत आहोत मराठा युवा सेनेच्या माध्यमातून अशा प्रकारे मुंबई या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे.
त्याचप्रमाणे सोलापूर येथे आज मंगळवार दिनांक 27 /12/2022 रोजी सायंकाळी 6 वाजता चार हुतात्मा पुतळा पार्क चौक या ठिकाणी चौकसभा घेऊन चौकात स्क्रीन लावून वाहतुकीला कोणताही अडथळा न करता ही सभा घेणार आहोत.


















