सोलापूर : शहिद टिपू सुल्तान ग्रुपने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करताना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केली, विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे लावला, विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवला म्हणून शहिद टिपू सुल्तान ग्रुपच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष सह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साउंड सर्व्हिसचा मालक बॉस लिहिलेला गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शकील मुस्तफा शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिवजन्मोत्सव सोहळा अयाज शेख उर्फ मन्या भाय, कार्याध्यक्ष आसिफ महंमद शेख, गौस कादर शेख, तमजित चांद गोगी, अकिल चांद पठाण असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी 18/02/2022 रोजी रात्री 10 च्या सुमारास भवानी पेठ जय भवानी प्रशालेच्या मैदानात जाऊन पाहिले असता मैदानात पूर्व बाजुला स्टेज मारलेला होता त्यावर शहिद टिपु सुल्तान ग्रुप शिवजन्मोत्सव अध्यक्ष अयाज शेख (मन्या भाय) आणि कार्याध्यक्ष आसिफ महंमद शेख असा डिजीटल बॅनर लावून स्टेज व खुर्चा टाकून गर्दी जमवून लोकांना लेजर शो दाखवत होते. बेकायदेशीर ड्रोन द्वारे शूटिंग सुरू होती.
त्यांना जोडभावी पेठ पोलिसांनी विचारणा केली असता सोलापूर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी त्यांनी घेतली नसल्याचे समोर आले. केवळ तालुका क्रीडा अधिकाऱ्याची परवानगी त्यांनी घेतली होती. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचा भंग करीत सुमारे दोनशे लोकांची गर्दी त्यांनी जमवली, पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी आदेशाचे ही उल्लंघन करण्यात आले.
त्यामुळे या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी शहाबुद्दीन रजाक कोरबु हा BOSS असे नाव लिहलेने साऊड बॉक्सचा मालक गर्दीचा फायदा घेऊन निघुन गेला आहे. या सर्वांवर कलम 143,188, 336,269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (1) (4) तसेच मु. पो. का. कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

















