महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनाचे व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोजगार स्वयंरोजगार शहर महिला संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूरातील ज्येष्ठ नेते रामचंद्र जुन्नू व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष सत्तार सय्यद, रोजगार स्वंयरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ, उपशहराध्यक्ष शोभा साठे, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष करुणा यादव, उपजिल्हाध्यक्ष एडवोकेट निलेश भंडारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, वाहतूक सेनेचे शहर संघटक जितू टेंभुर्णीकर, उपशहराध्यक्ष वैभव धोत्रे, रोजगार स्वंयरोजगार शहर संघटक गोविंद तांदळे, विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब सरवदे, शहर उपाध्यक्ष दिनेश हंचाटे, पवन देसाई, ओंकार धोत्रे, महाराष्ट्र पोलीस टाईमचे संपादक उमेश काळे, प्रदीप बंडे, मारुती संगा, सैफन जमखंडी, नितीन पंजाबी आदि उपस्थित होते.
दरम्यान लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासह महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.


















