सोलापुरात भाजपला धक्का राजेश्री चव्हाण यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयात रद्द
2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून भारतीय जनता पार्टीच्या राजश्री चव्हाण या चार मतांनी विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेसच्या एडवोकेट उमा पार्सेकर यांचा पराभव केला होता पराभवानंतर ऍडव्होकेट पार्सेकर यांनी राजश्री चव्हाण यांना तीन अपत्य असल्याबाबत सोलापूरच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती सोलापूर न्यायालयाने 2018 साली चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द केले मात्र या निकालाविरोधात नगरसेविका चव्हाण या उच्च न्यायालयात गेल्या होत्या या याचिकेवर 15 मार्च 2021 रोजी अंतिम सुनावणी घेण्यात आली या सुनावणीत पराभूत उमेदवार एडवोकेट पार्सेकर यांचे वकील अजित आळंगे यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना तीन अपत्य असल्याबाबत आपल्या नामनिर्देशनपत्रात कबूल केल्याचे व तीन मुलांचे जन्म दाखले न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिले व त्याप्रमाणे चव्हाण यांनी तीन अपत्य नसल्या बाबत कोणताही पुरावा कोर्टासमोर सादर केला नाही हे सर्व मुद्दे ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने राजश्री चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द केले मात्र राजश्री चव्हाण यांच्या वकिलांच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मिळाली आहे याचिकाकर्ते एडवोकेट उमा पार्सेकर यांच्या वतीने एडवोकेट अजित आळंगे नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या वतीने अडवोकेट अशोक ताजने व महापालिकेच्या वतीने एडवोकेट धनुरे यांनी काम पाहिले.


















