स्व.विरभद्रेश बसवंती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने, मित्र परिवाराच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असून यानिमित्ताने प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानूगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले आहे. सोलापूरकरांनी व विशेषतः तरुण वर्गानी बानूगुडे पाटील यांच्या निशुल्क असलेल्या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी माहिती स्व.विरभद्रेश बसवंती सेवा गौरव पुरस्कार समितीने केले आहे.
स्व. वीरभद्रेश बसवंती मित्र परिवाराच्या वतीने सन २०२३ या सालाचे सेवागौरव पुरस्काराकरिता कविता चव्हाण, मोहन तलकोकुल, राज सलगर, राजशेखर बुरकुले, आनंद तालितोटी, सचिन दाने यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रम प्रसंगी प्रख्यात व्याख्याते प्रा. नितीन बानूगडे पाटील यांचेप्रबोधनात्मक जाहीर व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा सोलापुरातील तमाम नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्व.वीरभद्रेश बसवंती मित्र परिवाराच्या वतीने करीत आहे. सदर कार्यक्रम सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वा. हुतात्मा स्मृती मंदीर सोलापूर येथे संपन्न होणार आहे.





















