सोलापूर : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एपीएफ 95 पेन्शनर्स समन्वय समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
देशभरातील सत्तर लाखाहून अधिक विविध १८५ संस्थेतील पेन्शन धारकांना सरासरी दरमहा फक्त रुपये एक हजार पेन्शन मिळते. सदर पेन्शन बाढ व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान , जिल्हाधिकारी साहेबा मार्फत लेखी निवेदन देत आहोत. सर्व पेन्शनधारक जेष्ठ नागरीक असून असलेल्या पेन्शन मध्ये जीवन जगूच शकत नाहीत.
सन २०१४ मध्ये आपल्या सरकारने कोशियारी समितीच्या अहवाला नुसार महागाई निर्देशांकांशी सांगड घालून सेवानिवृत्ती वेतन दयावे असे सूचवले होते. याचीही अंमलबजावनी झाली नाही. सध्या मिळत असलेली पेन्शन बाढवून दरमहा रु. ९००० (रु नऊ हजार) आणि महागाई भत्ता दयावा, आरोग्य, शिक्षण, प्रवास इत्यादी सोईसुविधा दयाव्यात. संपुर्ण देशातील ई पी ए 95 पेन्शनर्स एकसंघ असून सर्वांची अपेक्षा केंद्र सरकारने मागणी पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात कॉम्रेड रवींद्र मोकाशी, कुंडलिक मोरे, गोविंद कपडेकर, अशोक मोकळे, बापूराव विभुते, पंडित जळकोटे, महावीर क्षीरसागर, पुरुषोत्तम अडसूळ, दयानंद दुधाळे, बाळासाहेब पाटील, श्रीकांत भोसले, बालाजी मादास, नरसप्पा व्हटकर, राजेंद्र खराडे, लक्ष्मण साई, तानाजी भुट्टे, अ.रजाक मोहोळकर, उदय भोईटे यांची उपस्थिती होती.


















