सोलापूर : शेळगी भागातील पाटील खाण इथं मागील साठ वर्षापासून राहणारे भीमराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे घर महापालिका पाडण्याची कार्यवाही करत आहे त्या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री सागर पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुरेश ननवरे, शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष जुबेर हिरापुरे, जिल्हा संघटक आनंद जाधव, महिला आघाडीचे अध्यक्ष अश्विनी गायकवाड, मल्लिकार्जुन पिलगिरी, निलेश संगेपाग, आतिश गायकवाड, भीमराव चव्हाण, सुनिता चव्हाण, मोहन चव्हाण, पारूबाई राठोड, सुनीता राठोड, भिमाबाई पवार, सुरेखा पवार यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सागर पाटील आणि अश्विनी गायकवाड यांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला, अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबाला असे बेघर केले जात आहे, हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही महापालिका ही कारवाई कशी करू शकते, ही कारवाई न थांबल्यास आज कुटुंबाने आंदोलन केले उद्या शेळ्या, जनावरे आंदोलन स्थळी आणून बंधू असा इशारा देत बोंब ठोकली…

















