सोलापूर – अग्निपथ ही योजना देशाची संरक्षण व्यवस्था व गोपनीयतेला तिलांजली देऊन प्रचंड बेकारीची फौज निर्माण करणारी आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तरुणांना दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशात सर्वत्र हाहाकार माजत आहे याची दखल सरकार घायला तयार नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारने कोणत्याहीपरिस्थितीत ही योजना माघार घेतलीच पाहिजे अन्यथा हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होणार असा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी दिला.
यावेळी पूनम गेट येथे सकाळी 11 वाजता पोलिसांचा प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेव्हा युवा महासंघाचे सर्व कार्यकर्ते एकत्र जमून अग्निपथ योजनेच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडले. तदनंतर कार्यकर्ते नरेंद्र मोदी, अमित शहा,राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दडपशाही करून प्रतिमा जाळण्यास अटकाव केले तरीही सर्व कार्यकर्ते प्रतिमा फाडून घोषणाबाजी केली. तेव्हा जमाव आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली, धक्काबुक्की झाली.
अखेर सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी युवा महासंघाच्या 16 विक्रम कलबुर्गी, अनिल वासम,बाळकृष्ण मल्याळ, दत्ता चव्हाण,अकील शेख, सनी कोंडा, नरेश गुलापल्ली,मधुकर चिल्लाळ, आसिफ पठाण,राहुल बुगले,मोहसीन शेख, सद्दाम बागवान, कुमार येलगेटी, नितीन माकम,योगेश आकिम, बालाजी गुंडे, सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे दाखल केले.

















