सोलापूर : एमआयएम पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तौफिक शख यांना मोठा झटका बसला आहे. अतिशय जवळचे मानले जाणारे कट्टर समर्थक जावेद सय्यद उर्फ वास्तव यांनी AIMIM शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या काही कार्यकर्त्यासोबत AIMIM पक्ष्यामध्ये मध्ये जाहीर प्रवेश केला. शाब्दी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, दौला कुमठे, मोहसीन मैंदरगी यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




















