महासंचालक बार्टी व आयुक्त समाजकल्याण पुणे यांचे आदेशान्वये 01, एप्रिल ते 01 मे 2023 या कालावधीमध्ये “सामाजिक न्याय पर्व” या अतंर्गत जलदगतीने जातवैधता प्रमाणपत्रे तपासणी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
दि. 01 एप्रिल ते 11 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर, या समितीने या अकरा दिवसात एकूण 442 ऑनलाईन जातवैधता प्रमाणपत्राचे वितरण समितीकडून करण्यात आले. दि.13.04.2023 रोजी अर्जदार यांना त्रुर्टी पुर्तता करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समता पर्व या कालावधीमध्ये तालुका स्तरावर जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम व जात वैधता प्रमाणपत्राबाबत सहज, सुलभ, सोपी जातवैधता प्रणाली याबाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जे अर्जदार यांनी 12 वी सायन्स व डिप्लोमा अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमध्ये एलएलबी, बीएड, एमबीए, एमसीए, इंजिनिअरींग, मेडीकल या कोर्ससाठी प्रवेश घेणा-या ज्या विदयार्थ्यांनी अजून जातवैधता प्रमाणपत्रसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर या कार्यालयास 30 एप्रिल 2023 पर्यंत प्रस्ताव दाखल करावा. अर्जदार यांनी वेळेत प्रस्ताव समितीकडे दाखल केल्यास जेणेकरुन ॲडमिशनपूर्वी जातवैधता प्रमाणपत्र निर्गमीत करणे सोईचे होईल असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून करण्यात येत आहे.


















