सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे निरसित करु नका, अनुकंपातत्वावर वारसांना विनाअट नियुक्त दया, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या या मागण्या दिर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे.
गुरुवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता, सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने जागरण गोंधळ कार्यक्रम घेण्यात आला.
तुळजापूर भवानी आई पेन्शन दे…
कोल्हापूर अंबाबाई पेन्शन दे…
गोंधळ मांडीला आई पेन्शन दे…
“जेजुरीच्या खंडेराया पेन्शन दे……
पालीच्या तुम्ही गणराया लेकराला पेन्शन दे……”

















