सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील जन्म मृत्यू दाखला कार्यालयात नागरिकांची प्रचंड ओरड सुरू आहे या ठिकाणी उपनिबंधक यांच्याकडून अतिशय वाईट वागणूक मिळत असल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी आणि काँग्रेसचे सरचिटणीस श्रीशैल रणधिरे यांनी महापालिका आयुक्तांकडे याची तक्रार केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, सोलापूर महानगरपालिका जन्ममृत्यु उपनिबंधक कार्यालय येथील मनमानी कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जन्ममृत्यु दाखला मिळण्याकरिता तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत आहेत. काही नागरिकांना नाव दुरुस्ती करिता विभागील गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.
उपनिबंधक अरूंधती हराळकर यांना भेटायला गेल्यास वागणूक चांगली मिळत नाही. नागरिकांची अडचण सोडविण्यास असमर्थ असल्याचे जाणवत आहे व त्यांना आपल्या स्तरावरुन सुचना करण्यात याव्यात व सध्या शैक्षणिक प्रवेश सुरू असून विद्यार्थ्यांकरिता जन्मदाखल्याची आवश्यकता असते त्याकरिता दुरुस्त्या असतील असे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावून दाखले देण्यात यावेत अन्यथा हराळकर यांच्या विरोधात जन आंदोलन छिडावे लागेल असा इशारा रणधिरे व मोकाशी यांनी दिला आहे.


















